Friday, February 3, 2017
सचिन रमेश तेंडुलकर
सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई)
उच्चार: [səʨin rəmeˑɕ TÉÑDÜLKÄR] (सहाय्य·माहिती)) हा क्रिकेटविश्वातडॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सार्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती.[१] २०११ च्या विश्वचषकविजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.

पद्म विभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. सचिनला भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला .[२] हा सन्मान त्याला त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय विमानदलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला तो पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.
सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहे.
अनुक्रमणिका
[लपवा]सुरुवातीचे दिवस[संपादन]
सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मनह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकरह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/१९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द[संपादन]
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली
पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान,अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथीलकसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतरन्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्यादौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्ध) मालिकावीर राहिला आहे.


सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९, इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.
सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.
१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.
तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.
गोलंदाजी[संपादन]
तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.[३][४][५]
अनेक वेळा[६] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल,
- १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या[७] मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला
- १९९३ सालचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.[८]
- शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध[९] १० षटकांत ४/३४ ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला.
- आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर केला.
प्रसिद्ध खेळी[संपादन]
कसोटी क्रिकेट[संपादन]
धावा | प्रतिस्पर्धी | ठिकाण (वर्ष) | निकाल |
---|---|---|---|
११९ नाबाद | इंग्लंड | मँचेस्टर (१९९०) | अनिर्णित |
१४८ | ऑस्ट्रेलिया | सिडनी (१९९१-९२) | अनिर्णित |
११४* | ऑस्ट्रेलिया | पर्थ (१९९१-९२) | ऑस्ट्रेलिया |
१२२ | ईंग्लंड | बर्मिंगहॅम (१९९६) | ईंग्लंड |
१६९ | दक्षिण आफ्रिका | केप टाऊन (१९९६-९७) | दक्षिण आफ्रिका |
१५५ नाबाद | ऑस्ट्रेलिया | चेन्नई (१९९७-९८) | भारत |
१३६ | पाकिस्तान | चेन्नई (१९९८-९९) | पाकिस्तान |
१५५ | दक्षिण आफ्रिका | ब्लूमफॉँटेन (२००१-०२) | दक्षिण आफ्रिका |
१७६ | वेस्ट इंडीझ | कोलकाता (२००२-०३) | अनिर्णित |
२४१ नाबाद | ऑस्ट्रेलिया | सिडनी (२००४) | अनिर्णित |
१५४ नाबाद | ऑस्ट्रेलिया | सिडनी (२००८) | ऑस्ट्रेलिया |
* १८ वर्षाचा असताना वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो.
एकदिवसीय क्रिकेट[संपादन]
धावा | प्रतिस्पर्धी | ठिकाण (वर्ष) | निकाल |
---|---|---|---|
९० [१०] | ऑस्ट्रेलिया | मुंबई (१९९६ वि.च.+) | ऑस्ट्रेलिया |
१०४ | झिम्बाब्वे | बेनोनी (१९९७) | भारत |
१४३ | ऑस्ट्रेलिया | शारजाह (१९९८) | ऑस्ट्रेलिया |
१३४ | ऑस्ट्रेलिया | शारजाह (१९९८) | भारत |
१२४ | झिम्बाब्वे | शारजाह (१९९८) | भारत |
१८६ नाबाद | न्यूझीलँड | हैदराबाद (१९९९) | भारत |
९८ | पाकिस्तान | सेंच्युरीयन (२००३ वि.च.) | भारत |
१४१ | पाकिस्तान | रावळपिंडी (२००४) | पाकिस्तान |
१२३ | पाकिस्तान | अमदावाद (२००५) | पाकिस्तान |
९३ | श्रीलंका | नागपूर (२००५) | भारत |
२०० नाबाद | दक्षिण आफ्रिका | ग्वाल्हेर (२०१०) | भारत |
११४ | बांगलादेश | मिरपूर (२०१२)** | भारत |
+वि.च.-विश्वचषक **आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक
नमस्कार
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझ्या ब्लोगवर आपले स्वागत आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझ्या ब्लोगवर आपले स्वागत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)